कोंबड्यांचे दर्शन सोहळे !

पेरियार रामासामी लिखित रामायनातील सत्य नावाच पुस्तक वाचल्यास आजपर्यंत राम व रामायणातील कधीच कोणी न सांगितलेल वास्तव वाचायला मिळत, पण आमची लोक न वाचताच देव्हारे मांडतात म्हणून तर तथाकथित राम'डास', राम'रहीम', 'नथ्थू'राम 'आसा'राम किंवा 'परशु'राम नावाचा किडा, विषाणू डोक्यातून हद्दपार होत नाही.

0 15
कोंबड्यांचे दर्शन सोहळे !
✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे 
               लेखक
         भट बोकड मोठा
       मो. ९७६२६३६६६२
पेरियार रामासामी लिखित रामायनातील सत्य नावाच पुस्तक वाचल्यास आजपर्यंत राम व रामायणातील कधीच कोणी न सांगितलेल वास्तव वाचायला मिळत, पण आमची लोक न वाचताच देव्हारे मांडतात म्हणून तर तथाकथित राम’डास’, राम’रहीम’, ‘नथ्थू’राम ‘आसा’राम किंवा ‘परशु’राम नावाचा किडा, विषाणू डोक्यातून हद्दपार होत नाही. त्यामुळे आपल्याला आपले वाटणारे राजकीय पुढारी जे संघाच्या उकीरड्यावर सकाळी सकाळी बांग देऊन आपल्या घरी परतल्याचा आव आणतात त्यांना वरील विषाणूचा संसर्ग झाला आहे ?तो विषाणू ते आपल्या भक्तांमार्फत गावागावात पसरवून जातीयतेची व धर्मांधंतेची लागण करत आहेत. त्यामुळे अशा उकीरड्यांवरील कोंबड्यांचे दर्शन सोहळे जोमात चालू आहेत पण इकडे सामान्य जनता महागाईने व सुशिक्षित तरुण बेरोजगारीने कोमात जातोय त्याकडे हे भक्तांचे पापा कधी लक्ष देणार आहेत हा आमचा प्रश्न आहे.
एक नेता देशातील मंदीरे धूंडाळून येतो न येतो तोच दुसरा आपली कावढं उचलून दर कोस दर मुक्काम करत मंदीराभोवती ‘घालीन लोटांगण वंदीन चरण’ करत शोभायात्रा करत आहे. मग ज्यांचे नेतेच मंदीराभोवती लोटांगण घालत आहेत त्यांचे अंधभक्त धर्माधंतेच्या नावाखाली पटांगण सर करताना दिसतात ही खुप मोठी शोकांतिका आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे येत्या ५ जून रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांच्या वारंवार बैठका होत असून तयारीचा आढावा घेतला जात आहे. प्रत्येक जिल्ह्यातून किती कार्यकर्ते अयोध्येला जाणार ?किती ट्रेन लागणार ?कोणत्या विभागातून किती गाड्या निघणार ?तसेच स्त्री आणि पुरुष कार्यकर्ते किती असतील या सर्वांचा आढावा घेतला जात आहे. कारण राज्यातून सुमारे १५ हजार मनसे सैनिक अयोध्येला जाणार असल्याची माहिती मिळत आहेत. मुंबईतील मनसेच्या प्रत्येक विभाग अध्यक्षाने रेल्वेची एक बोगी बुक केली आहे. आतापर्यंत एकूण १२ ट्रेनचे मनसेने बुकिंग केले आहे. तर काही पदाधिकारी बायरोड अयोध्येला येणार आहेत. ५ जून पूर्वीच हे पदाधिकारी अयोध्येत दाखल होणार आहेत. मुंबईतून बोरिवली विभागातून १०० गाड्या अयोध्येला जाणार आहेत. अशी माहिती मनसेचे विभागप्रमुख यशवंत किल्लेदार यांनी दिली. (टीव्ही ९ मराठी १८ मे २२) राज ठाकरे यांनी त्यांचे आजोबा व बहुजन चळवळींना ज्यांच्या विचारांच खाद्य मिळाल ते प्रबोधनकार ठाकरे यांचे देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे हे पुस्तक वाचल असत तर या बांडगुळांनी नसती उठाठेव केली असती का ?जिथे पिकते तिथे मुळीच त्याची किंमत नसते हे राज ठाकरे यांच्या आजच्या वर्तनुकीवरून सहज लक्षात येते कारण प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की, “एक शिवाजी हे नुसते नाव जरी उच्चारले तरी हिंदुच्या तेहतीस कोटी देवांची फलटन बाद होते.” तर मग बाद होणा-या या फलटनीला धरुन राज ठाकरे काय साध्य करू पाहताहेत ?तरुणांना आयोध्येला घेऊन जाण्यासाठी ट्रेन बुक करण्याऐवजी त्या तरुणांना रोजगार कसा देता येईल हे राज ठाकरे का पाहत नाहीत ?आयोध्या दौरा नियोजनाच्या बैठकीत शेतक-यांना भेडसावणारा उसाचा प्रश्न राज ठाकरे का घेत नाहीत ?
महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी रामाच्या अयोध्या नगरीत ?जाण्याची घोषणा केली त्यात मंत्री आदित्य ठाकरे १० जून रोजी सेना खासदारांसह अयोध्येला जातील. (मटा ९ मे २२) स्वतःला हिंदुत्ववादी समाजणारे शिवसेनेचे नेते व पदाधिका-यांनी रामाच्या नावाने दिंडोरा पिटनं योग्य नसतानाही योग्य आहे अस म्हणाव लागेल कारण आपल्याच घरची नवीन पिढी अशी अवैचारिक जन्माला येईल अस प्रबोधनकारांना स्वप्नात देखिल वाटल नसेल पण ती अशी जन्माला आली हे दुर्देव म्हणाव लागेल. कारण प्रबोधनकार ठाकरे हे त्यांच्या देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे या पुस्तकात म्हणतात की, “इसवी सनाच्या २ -या व ३ -या शतकांपर्यत हिंदू जनात व हिंदुस्थानात देवळे घुसलेली नव्हती. जीर्णमताभिमानी व आत्मवर्चस्वाभिमानी भटांच्या भिक्षुकशाहीने नवमतवादी बौध्द धर्माचा पाडाव करून भटी वर्चस्व स्थापनेसाठी इसवी सनाच्या २ -या शतकांत महाभारत व रामायणाच्या जून्या आवृत्या मनसोक्त घालघुसडीच्या फोडणींने फुगविल्या आणि मनुस्मृतीला जन्म दिला.” हे ठाकरेंच्या कुटुंबियांनी वाचल किंवा समजून घेतल नसेल म्हणून तर असे मंदीरांच्या पाय-यावर लोटांगण घेणारे विघ्नसंतोषी कुलदिपक ?जन्माला आले आहेत म्हणून तर बिजेचे अभंग या पुस्तकात विश्वंभर वराट म्हणतात की,
“ना जन्मला राम ना सिता चोरली।
वाजली मुरली नाही येथे !
जंबुद्विपामाजी बुध्दाची मीरासी।
मथुरा नी काशी बुध्दाचीच !
बालाजी असो की असो जगन्नाथ।
साक्ष पुरातत्व देते याची !
लावले सर्वांना भटांनी चंदन।
विशंभरा भान आहे याचे !”
अयोध्या आता महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दर्शन शर्यतीचा केंद्रबिंदू बनत आहे. हिंदुत्वाच्या राजकारणाचा वारसदार म्हणून टिकून राहण्याच्या शर्यतीपासून राष्ट्रवादीलाही दूर राहायचे नाही. त्यामुळे आमदार रोहित पवारांनी आई-बाबांसोबत सहकुटुंब चार दिवसांच्या तिर्थयात्रेचं नियोजन केले. त्यांच्या तिर्थयात्रेची सुरवात अर्थातच महाराष्ट्राच्या कोट्यावधी जनतेचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री. विठुरायाच्या दर्शनाने झाली. पवारांचा हा अयोध्या दौराही अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. ते रामलल्लाचे दर्शन घेऊन मतदारांना संदेश देण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहेत. (टाईम्स ना. ०६ मे २२) पंढरीच्या पांडुरंगाच दर्शन घेऊन देवदर्शनाची सुरूवात करणा-या रोहीत पवारांना सांगावं वाटत की, ‘इतर देवाचे न पाहू तोंड विठ्ठल माझा प्रचंड !’ अस संत नामदेव महाराज सांगून गेलेत तर मग इतर देवाच तोंड तुम्ही कशासाठी पाहत आहात ?आयोध्येत जाऊन येथिल मताच राजकारण करायच आहे का ?इकडे महागाई बेरोजगारीने देशासह राज्यातील जनता होपरळत असताना तुम्ही मात्र बायकोसोबत मौज मजा करत देवदर्शन करत फिरता हेच या महाराष्ट्राच दूर्देव आहे. सर्वेसर्वा शरद पवार प्रतिगामी विचारांच्या नावाने शंख करत पुरोगामींना आपलेसे करून घेतात पण मध्येच हुक्की आल्याप्रमाणे जशी गाय शिंगे मोडून वासरात शिरते तसे ते पुरोगामी विचार सोडून प्रतिगामीत्वाच्या नावाने दिंडोरा पिटतात, नव्हे नव्हे प्रतीगामी विचारधारेची चड्डी ?परीधान करतात. पण त्यांची भक्ताड पिलावळ ते वैचारिक पुरोगामी आहेत असे दाखवून मध्येच मध्येच प्रतीगामित्वाचे झेंडे धरतात. त्यामुळेच तर पुरोगामित्वाची पांघरलेली बेगडी शाल बाजूला सारून प्रतिगामीत्वाची कुजकी शाल परिधान करताना आ.रोहीत पवार दिसत आहेत ही खुप मोठी शोकांतिका आहे. राजकारणासाठी पुरोगामी विचारांना तडजोड करणारे नेते तयार झाले की, नवीन भक्तांची पिलावळ अंधश्रध्दाळू व भक्ताळू बनते मग याचाच फायदा घेऊन हे राजकीय नेते आपली पोळी कधी या मुद्यावर तर कधी त्या मुद्यावर शेकून घेतात पण भक्तांच्या हाती लागत काय तर घंटा ?आ. रोहीत पवारांना हिंदुत्वाचे डोहाळे लागल्याने त्यांना सामान्य लोकांच्या प्रश्नापेक्षा झेंडे दांडे व मंदीर मस्जिद हिताचे वाटू लागल्याने ते देवाच्या नावाने मंदीराच्या पाय-यावर तर कधी थडग्यावर डोक टेकवताना दिसत आहेत हे कोणीही नाकारू शकत नाही.
अयोध्येतील दशरथ गादीचे प्रमुख महंत ब्रिजमोहनदास यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची काँग्रेस कार्यालयात भेट घेतली. यावेळी त्यांनी नाना पटोले यांना अयोध्येला भेट देऊन प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन घेण्याचे निमंत्रण दिले. याप्रसंगी त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करत नाना पटोले यांनी महंतांचे आभार व्यक्त केले. लवकरच आपण अयोध्येला येऊ, असा शब्द त्यांनी महंतांना दिला. (मटा ९ मे २२) आयोध्येत येऊ अस आश्वासन देणा-या नाना पटोलेंना विचाराव वाटत की, तुम्ही काँग्रेसी डाँ. बुध्द शिव फुले शाहु आंबेडकर यांच नाव घेऊन दुकान चालवता ?या महापुरुषांनी कधी रामाच उदात्तीकरण केल आहे का ?तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेता त्यांनी बौध्द धर्माच्या ज्या बावीस प्रतिज्ञा सांगितल्या आहेत त्यात स्पष्ट म्हटले की, ‘मी राम कृष्ण यांना देव मानणार नाही व त्यांची पुजा करणार नाही.’ तर मग राजकारणासाठी नाना पटोले स्वतःला काय डाँ. बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा ग्रेट समजू लागले का ?इव्हीएम विषयी कधी तळ्यात तर कधी मळ्यात भूमिका घेणारे नाना पटोले हे यापुर्वी संघाच्या उकिरड्यांवर बांग देत होते हे महाराष्ट्र जाणून आहे त्यामुळे तुम्ही आयोध्येत नव्हे तर कुठे मातीत गेलात तरी महाराष्ट्राला फरक पडणार नाही कारण महाराष्ट्र हा महात्मा जोतिबा फुले, शाहू महाराज व आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा आहे त्यामुळे राळेगण सिध्दीचे आण्णा असोत नाहीतर नागपुरचे काँग्रेसी नाना असोत यांनी कोणाचेही देव्हारे माजवले तरी त्यांना जनता भुलणार नाही. यामुळे राळेगणच्या आण्णांनी व नागपुरच्या नानांनी सावध होऊन आपले अजेंडे बदलावेत कारण देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे या पुस्तकात प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की, ‘हिंदुस्थान दरिद्री झाला. मातीतून अन्न काढणारा शेतकरी वर्ग भिकेला लागला. देशी धंदे ठार मेले मध्यम वर्ग नामशेष झाला सुरक्षित पदवीधरांची उपासमार बोकाळली इत्यादी वगैरे आरडाओरडा करण्यातच राजकारणी अकलेच्या कवायती करणा-या ब्रम्हांड पंडितांनी हिंदुस्थांनातील देवळात केवढी अपार संपत्ती निष्कारण अडकून पडली आहे आणि तिचा उपयोग देशोध्दाराच्या कामी न होता लुच्या लफंग्या चोर जार ऐदी हलकटांच्या चैनीसाठी कसा होत आहे इकडे आता कसोशींने लक्ष देण्याची वेळ आली आहे. दुष्काळाने कोट्यावधी लोक देशांत अन्न अन्न करून मेले तरी देवळांतल्या दगडाधोंड्यांना केशरीभाताचा त्रिकाळ नैवेद्य अखंड चालूच आहे.’ याकडे थोडस संघाचे पुर्णवेळ प्रचारक आण्णा ?व शंबुकाचा मारेकरी रामाचे समर्थक नाना ?यांनी लक्ष दिल तर बर होईल. विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
“राम राज्य आणायची
भक्तांना सुटली घाई !
बोंबलू नका पुन्हा
चोरी जातील सीताबाई !.”
बहुजन समाजाला शेवटी सांगावं वाटत की, स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी हे राजकीय लोक कधी वेगवेगळ्या रंगाचा झेंडा तर कधी विविध पक्षाचा किंवा विचारधारेचा दांडा हातात घेऊन तुम्हाला शिक्षणाकडे घेऊन जाण्याऐवजी ते फरफटत मंदीराकडे घेऊन जातील तेव्हा वेळीच सावध व्हा !. कारण मंदीरानं गाडग्याप्रमाणे ढे-या घेऊन मिरवणा-या ब्राम्हण पुरोहीत वगळता आजपर्यंत कोणाचही भल झाल झालेल नाही. भगवा झेंडा हा तथागतांचा, तुकोबा, शिवाजी महाराजांचा असून ते त्यागाचं प्रतिक आहे, मात्र आज तो भगवा काही मुठभर लोकांनी कलंकीत केला आहे, त्यामुळे त्या नकली भगवा धा-यापासुन दूर रहा. म्हणून तर तुकोबाराय म्हणून गेलेत की, ‘भगवे जरी श्वास सहज वेश त्याचा तेथे अनुभवाचा काय पंथ.’ शंबुकाचा मारेकरी जर राज ठाकरे, रोहीत पवार, आदित्य ठाकरे व नाना पटोले यांचा आदर्श असेल तर यांच्याकडून शोषित पिडीत व वंचित समाजाच्या सन्मानाची अपेक्षा करण म्हणजे आराराम रामरहीम यांच्याकडून स्त्रीयांच्या सन्मानाची अपेक्षा करण्यासारख आहे. त्यामुळे शिका वाचा विचार करा बुध्दीवंत आणि किर्तीवंत व्हा आणि या मनुवादी कोंबड्यांना हद्दपार करा कारण अजून वेळ गेलेली नाही. म्हणून तर विद्रोही कवी तसेच बिजेचे अभंग या पुस्तकाचे लेखक विश्वंभर वराट म्हणतात की,
“जय श्रीराम……… म्हणून
बाग देतात भटांचे कोंबडे !
त्यांचे करतात राजाकारण
राजकीय भक्ताड चोंबडे !”
Leave A Reply

Your email address will not be published.