ह.भ.प. मस्के किर्तनकार की नर्तनकार

पावसाळा सुरु झाला की जसा बेंडकांचा सुळसुळाट सुरू होतो, तसा उन्हाळा सुरू झाला की, स्वयंघोषित ह.भ.प. चा सुळसुळाट सुरू होतो ? नाचू किर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी अस संतांनी सागितलं पण आज जे गावागावात अखंड हरिनाम सप्ते होतात त्यातून कोणते ज्ञानदीप लावले जातात ? अंधश्रद्धेला आळा बसेल यावर काही उपाययोजना सांगितल्या जातात ?संत नामदेव व तुकोबांचे अभंग हे आजच्या पिढीला वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवण्यासाठी खुप म्हणत्वाचे आहेत पण त्या अभंगावर आजचे तथाकथित ह.भ.प. किती अभंगावर बोलतात ?सप्त्याच्या नावाने पैसा गोळा करून खर्च केला जातो पण त्यातून कोणाला काही ज्ञान मिळो न मिळो पण, ह.भ.प.ची चांदी होते कारण पैसा देऊन भाड्याने आणलेले ह.भ.प. गावात येऊन कोणत्या विषयावर आभाळ हेपलतात ? ह.भ.प. जे तत्वज्ञान लोकांना झाडतात ते स्वतः अंगिकारतात का ?याच उत्तर नाही हेच असेल कारण औरंगाबाद येथिल घटनेवरून सहज लक्षात येते.

0 104
ह.भ.प. मस्के किर्तनकार की नर्तनकार

 

✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे
       ‘भट बोकड मोठा’ पुस्तकाचे लेखक
       मो. ९७६२६३६६६२

 

कुटुनिया टाळ काढताती गळे ! जीव तळमळे मद्यासाठी !
नित्यनेम वारी एकादशी करी !बारशीला न्ह्यारी मटणाची !
जपे माळ मुद्र मुखी नारायण ! करी पारायण पापाचेच !
ऐसे कैसे भक्त पुसे विश्वंभर ! कुसंगी जागर करीतात !
बिजेचे अभंग या पुस्तकातील विद्रोही कवी विश्वभंभर वराट यांचा हा अभंग आजच्या तथाकथित ह.भ.प.ना शभंर टक्के लागू पडतो कारण पावसाळा सुरु झाला की जसा बेंडकांचा सुळसुळाट सुरू होतो, तसा उन्हाळा सुरू झाला की, स्वयंघोषित ह.भ.प. चा सुळसुळाट सुरू होतो ? नाचू किर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी अस संतांनी सागितलं पण आज जे गावागावात अखंड हरिनाम सप्ते होतात त्यातून कोणते ज्ञानदीप लावले जातात ? अंधश्रद्धेला आळा बसेल यावर काही उपाययोजना सांगितल्या जातात ?संत नामदेव व तुकोबांचे अभंग हे आजच्या पिढीला वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवण्यासाठी खुप म्हणत्वाचे आहेत पण त्या अभंगावर आजचे तथाकथित ह.भ.प. किती अभंगावर बोलतात ?सप्त्याच्या नावाने पैसा गोळा करून खर्च केला जातो पण त्यातून कोणाला काही ज्ञान मिळो न मिळो पण, ह.भ.प.ची चांदी होते कारण पैसा देऊन भाड्याने आणलेले ह.भ.प. गावात येऊन कोणत्या विषयावर आभाळ हेपलतात ? ह.भ.प. जे तत्वज्ञान लोकांना झाडतात ते स्वतः अंगिकारतात का ?याच उत्तर नाही हेच असेल कारण औरंगाबाद येथिल घटनेवरून सहज लक्षात येते. म्हणून भागवत व स्पेशल दर्शन सोहळे ठेऊन पैसा कोण कमावतो ?या अशा अनेक प्रश्नांची उत्तर आजही सापडत नाहीत म्हणून तर कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
काय म्हणे आम्ही केले अन्नदान ! जेवल्या जेवण भरविले !
कथा किर्तनाने काय साधियले ! बुवा जगविले अनाठायी !
गावी उभारीले हरिनाम सप्ते ! गोळा केले हप्ते नाडवूनी !
ऐशीया गवारा बोले विश्वंभर ! शाळेला छप्पर धड नाही !.
एकीकडे पराविया नारी रुखमाई सामन म्हणणारे संत तुकोबाराय होते तर दुसरीकडे महीलांना हीन लेखणारे आजचे तथाकथित भाडेकरू ह.भ.प. समाजाचा पैसा घेऊन महापुरुषांच्या विचारांची माती करून समाजाची मती भ्रष्ट करताना दिसतात. तेव्हा त्यांना आळा बसवण्यासाठी सामाजिक चळवळींनी हस्तक्षेप केला तर काय चुकीच आहे ?ब्रिगेडने महेंद्र मस्केला त्याने केलेल्या चुकीबद्दल विचारल्यास तमाम ह.भ.प. चं पित्त खवळतं, पण ते का खवळाव ? हो यांचा धंदा कोमात जाण्याची भिती या तथाकथित ह.भ.प. ना भेडसावत नसेल कशावरून ?आज गल्लोगल्ली तुकोबांच्या विचारांचे पाईक निर्माण होण्याऐवजी धंदेवाईक ह.भ.प. तयार होताना दिसत आहेत ?मग हे भुरटे स्वतःच्या धंद्यासाठी किर्तनातून समाजाला संताचे खरे विचार सांगण्याऐवजी  ब्राम्हणवाद्यांच्या इशा-यावर नाच करत, शिवाजी महाराजाच्या गुरूपदी जिजाऊ व तुकोबा दाखवण्याऐवजी नागडा रामदास जोडुन तुकोबाच सदेह वैकुंठ गमन सांगतात त्या तथाकथित बांडगुळांना विद्रोही कवी विश्वंभर वराट याच्या शब्दात विचाराव वाटत की,  
वैकुंठाची वाट दाखवी आम्हाशी ! येवू तुकोबाशी घेऊनिया !
ग्रहगोल आम्ही पालथे घातले !वैकुंठ दिसले नाही कोठे !
कैलास पाताळ स्वर्ग आणि नर्क ! उगाच हे मुर्ख बोंबलती !
म्हणे विश्वंभर पुरावा न देतो ! बारा बापाचा तो समजावा !
आजचे तथाकथित किर्तनकार ब्राम्हणांच्या मनाप्रमाणे मते मांडताना दिसतात तेव्हा संभाजी ब्रिगेड किंवा पुरोगामी चळवळीतील तरुण ह.भ.प. ना वैचारिक पध्दतीने प्रश्न चूकीच आहे ?जर वैचारिक पद्धतीने उत्तरे मिळत नसेल तर एखादी कानशिलात लगावताच ह.भ.प. पोपटपंचीच्या माध्यमातून चूक मान्य करून माफी मागत असेल तर संभाजी ब्रिगेडकचं काय चुकल ?.
अशाच एका तथाकथित मस्के नावाच्या ह.भ.प. वर हिंगोली जिल्ह्यात संभाजी ब्रिगेडने ‘विचार आणि कृती’ चा कार्यक्रम राबवला होता, त्याबद्दल मिडीयाने अर्धवट माहीतीच्या आधारे हल्ला हल्ला करत कल्ला करून बातमीही प्रसिध्द केली. त्यात म्हटले की, हिंगोलीत भाजपा अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र महाराज म्हस्के यांनी वसमत तालुक्यातील भेंडेगाव येथे किर्तनादरम्यान छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले त्यामुळे संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांनी ही मारहाण केली. मात्र, हे सर्व आरोप महेंद्र महाराज म्हस्के यांनी फेटाळून लावले कारण जिल्ह्यात भाजपा अध्यात्मिक आघाडीचे काम जोमाने करत असल्याने सूड भावनेतून आपल्यावर हा हल्ला करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (साम १५ एप्रिल २२) प्रसारमाध्यांसमोर खर नाकारणारा तथाकथित मस्के नावाचा किर्तनकार संभाजी ब्रिगेडने लावलेले आरोप सरळसरळ नाकारतो तेव्हा हा तथाकथित ह.भ.प. खोटारडा आहे अस म्हटल तर चुकीच आहे. काही काही ह.भ.प. तर चाळे करताना कँमे-यात कौद झाले आहे म्हणून तर
नका म्हणू मज हभप फबप। होतो बहू ताप चित्ता माझ्या !
हभप हा शब्द घृणास्पद झाला !मलीन तो केला हभप ने !
ऐसे कितीतरी निघाले हभप ! काय ते अबब पोरीसंगे !
म्हणे विश्वंभर सांभाळीन पत ! हभप ताईत गळा नको !
कीर्तनकार महाराज महेंद्र मस्केनी मारहाण केली या घटनेला दोन महिने उलटल्यानंतर हा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. त्यामुळे महेंद्र महाराज मस्के यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले. अखेर मस्के यांच्या तक्रारीवरून कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सतीश जाधव यांच्यासह ३६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (मटा २० एप्रिल २२) तेव्हा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सतीश जाधव म्हणाले की, संभाजी ब्रिगेड ही वारकरी संप्रदायाच्या पायाभूत विचारांवर चालणारी संघटना आहे. कारण सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता अस तुकाराम महाराज म्हणाले आहेत. जर कोणी किर्तनाच्या माध्यमातून खोट सांगून समाजाची दिशाभूल करत असेल तर त्यावर चिकित्सा व विचारमंथन झालेच पाहीजे. त्याच विचारधारेला प्रमाणभूत मानत ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी’ याप्रमाणे प्रश्न केल्यास मस्केकडे उत्तरे नव्हती त्यामुळे त्यांनी माफी मागितली. या क्लिपमुळे त्यांना किर्तनासाठी कोणी बोलावणे कमी झाले. त्यातून सहानुभुती मिळावी म्हणून त्यांने खोटा गुन्हा दाखल केला आहे. पण संभाजी ब्रिगेड हे आग्या मोव्होळ आहे, जो कोणी त्याला डिवचेल त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही अस ते म्हणाले. म्हणून लोकांना सांगावं वाटत की, केवळ भगवे उपरणे, टिळा टोपी घालून मी ह.भ.प. असल्याचा बहाणा करत असेल अन् तुम्ही तो आपल्या जातीचा आहे म्हणून त्यांच्या चुकांना खतपाणी घालत असाल तर हे चुकीच आहे. तो आपल्या जातीचा असेल पण मतीचा आहे का ?याचा विचार कधी करणार म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
लाविता एरंड गुळ कैसा मिळे ! बिया तैशी फळे लाभतील !
लिंबाला बांधला साखरेचा पार ! लिंबूळ्या खजूर होतील का !.
तथाकथित किर्तनकार महेंद्र मस्के याने छ. शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची केलेली चुकीची मांडणी व महीलांचा केलेला अवमान हे पाहून संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आक्रमक झाले. त्यानंतर टीम केसरीने भोंडेगाव येथे जाऊन गावातील नागरीकांशी चर्चा केली तेव्हा गावकरी म्हणाले की, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सतिश पाटील यांची भूमिका योग्य आहे. मस्के महाराजांनी महीलांविषयी चूकीचे शब्द वापरले होते. तसेच छ. शिवाजी महाराज व रामदास यांचा काहीएक संबंध नाही असा न्यायालयाने दिलेला निर्णय असतानाही मस्के महाराजांनी छ. शिवाजी महाराजांचे गुरू रामदास आहेत अशी मांडणी केली, तेव्हा संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. तसेच गावचे सरपंच म्हणाले की, महीलांविषयी व राजमाता जिजाऊ यांच्याविषयी मस्के महाराजांनी वापरलेले शब्द चूकीचे होते. छ. शिवाजी महाराजांचा अपमान कोणीही सहन करू शकत नाही, त्यामुळे आमचे संपुर्ण गाव संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सतिश पाटील यांच्या मागे उभे आहे.
जे गावकरी महीला किर्तनकारांचे किर्तन ठेवतात ते फक्त महीला किर्तनकारांचा वास घेण्यासाठी ठेवतात अस तथाकथित मस्के महाराज म्हणाले होते त्यासंदर्भात गावातील महीलांना चौकशी केली असता म्हणाल्या की, मस्के महाराज हा वारकरी संप्रदायाचा महाराज वाटतच नव्हता, त्याच बोलण बेकार होत. महीलांना घेऊन जाऊन टाकून द्या, महीला पावडर लावतात आणि अजून काय काय करतात अस म्हणत स्वतःकडे तलवार असल्याचे तो सांगत होता. त्या महाराजाला काय करायचे महीला काय करतात ते ?असल्या महाराजांना हाणल ते बर केल असेही महीला म्हणाल्या. (केसरी १९ एप्रिल २२)
यापुर्वीही मस्के सारख्या अनेक तथाकदथित ह.भ.प. नी मराठा सेवा संघाचे संस्थापक मा. पुरूषोत्तम खेडेकर यांचेवर अनेक आरोप केले होते. त्या सर्वांना संभाजी ब्रिगेडने जशाच तसे उत्तर दिले, त्यामुळे ते तथाकथित ह.भ.प. आम्ही चुकलो म्हणत माफी मागतानाचे व्हिडीओ त्यावेळी सोशल मिडीयावर आले होते. कारण महापुरुष व बहुजनवादी संताचे विचार घराघरात घेऊन जाण्यात मराठा सेवा संघाचा खुप मोठा वाटा आहे. महापुरुष व संतांचे विचार वाचायला लावणारे संघटन म्हणजे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आहे. वाचण करण व इतरांना वाचण्याची गोडी निर्माण करून देण्याच काम मराठा सेवा संघ मागिल तीस वर्षापासून करत आहे. मराठा सेवा संघामुळे मराठा समाजातील तरूणांच्या घरात महात्मा फुले, डाँ. बाबासाहेब आंबेडकर, आहील्यामाई होळकर, आण्णाभाऊ साठे यांचे खरे विचार पोहोचल्यामुळे आज मराठ्यांच्या घरात बाबासाहेबांची प्रतिभा दिसते ही मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडने केलेली वैचारिक क्रांती आहे.
तथाकथित किर्तनकाराला जाब विचारताना थोडीसी धक्काबुकी केली तर काय झाल ?कारण नाठाळाचे माथा मारू सोठा ही शिकवण तुकोबांची आहे, तुकोबांच्या विचारांचा वसा आणि वारसा जोपासण्याच काम संभाजी ब्रिगेड करतेय हे कोणीही नाकारू शकत नाही. पण ह्या धक्काबुक्कीमुळे काही जातीयवादी बांडगुळांनी त्या महाराजाची जात काढून धनगर समाजाच्या महाराजाला मारहाण अशी आरोळी ठोकली. त्यांबद्दल संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे म्हणाले की, वारक-यांना जात नसते, त्यामुळे महाराष्ट्रात जातीयवादी राजकारण पेटवू नका अस म्हणाले. म्हणून जातीयवाद करणा-या बांडगुळांना सागावं वाटत की, त्या तथाकथित नर्तनकारला धनगर असल्यामुळे धक्काबीक्की केलेली नसून कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा सन्मान न राखता अवमान करत छ. शिवाजी महाराजांच्या गुरू माँसाहेब जिजाऊ यांच्यावर संशय घेत इतर महिलांविषयी ज्या तोंडाने मस्के घाण ओकला तेच फोडण्याच काम संभाजी ब्रिगेडने केल आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्या विरोधात महेंद्र महाराज यांनी जी खोटी तक्रार दाखल केली त्याविरोधात मराठा क्रांती मोर्चाने तहशिलवर मोर्चा काढला होता कारण कधीही समाज सत्याच्या बाजूने उभ राहतो. स्वतःला धनगर समाजणा-या महेंद्र मस्केला जेवढे अहील्यामाईंचे कार्य माहीत नसेल त्यापेक्षा जास्त पटीने संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्याला माहीत आहे. आजपर्यत आम्हा बहुजन समाजाला केवळ पिंड हातात घेतलेल्या आहील्यामाई दाखवल्या पण त्यापलीकडेही त्यांचे कार्य होते हे आम्हा तरुणांना केवळ मराठा सेवा संघाने दाखवले. त्यामुळे स्वतःला धनगर म्हणून मिरवणा-या पण ब्राम्हणी मेंदूच्या इशा-यावर नर्तन करणा-या महेंद्र मस्केंनी व त्यांना पाठीशी घालणा-या जातीयवादी बांडगुळांनी जातीचा आव आणू नये. हो तो तुमच्या जातीचा असेल तो तुमच्या मतीचा आहे का हे ओळण्याची कला प्रत्येकाकडे नसते म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
कावळा कोकीळ रंग आहे काळा !ऐकताची गळा भेद कळे !
खडीसाखरेची गोडी जिभेवरी !लागे फीटकरी कषाय ती !
फणसाचे गर असे अंरूदनी ! गुण बाहेरुनी कैसा कळे !
म्हणे विश्वंभर साधु आणि भोंदू ! दोहोतला भेंदू पारखावा !
शेवटी बहुजन समाजाला सांगाव वाटत की, कथा किर्तनातून प्रबोधन झाल पाहीजे या उद्देशाने कार्यक्रम आयोजित करा. पण समाजाचा पैसा घेऊन समाजातील महीलांना व महापुरूषांना अपमानित करणा-या तथाकथित महेंद्र मस्के सारख्या भामट्या नर्तनकारांना गावत प्रवेश देऊ नका. हे भगवे, पांढरे उपरणे व टिळा टोपी परिधान करून धर्माच्या नावाने उदो उदो करणारी पिलावळ तुमच्या पैश्यावर ऐसो आरामत जगत आहे, त्यामुळे वेळीच सावध व्हा. जो किर्तनकार न्यायालयाने दिलेल्या आदेशाच पालन करत नाही त्याला संभाजी ब्रिगेड प्रथमतः वैचारिक पध्दतीने चोप देईल, पण तरीही त्या तथाकथित किर्तनकाराची शेपटी सरळ झालीच नाही तर, सरतेशेवटी शेपटीवर घाव कसा घालायचा याच शिवतंत्र संभाजी ब्रिगेडकडे आहे हे तथाकथित ह.भ.प.नी विसरू नये. कारण इतिहासाच विकृतीकरण संभाजी ब्रिगेड कधीही खपवून घेत नाही. त्यामुळे महापुरुषांविषयी बोलताना विचार करून बोला अन्यथा तुमचा पुरंदरे, गिरीश कुबेर करायला काहीच वेळ लागणार नाही. म्हणून शेवटी विश्वंभर वराट यांच्या शब्दात सांगावं वाटत की,
बांधुनिया मठ संत झाले शेठ ! संपत्ती अफाट साठवूनी !
नेसुनी सोळवे भगवे पिवळे ! कापीतात गळे भाविकाचे !
कथा प्रवचन योगयाग ध्यान ! भजन पुजन रात्रंदिन !
भक्तीच्या घाण्याला जुंपलेले रेडे !म्हणे भक्त वेडे विश्वंभर !
नवनाथ रेपे लिखित ‘भट बोकड मोठा’ हे पुस्तक घरपोहोच मिळेल.
संपर्क – रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)
मो. ९७६४४०८७९४
Leave A Reply

Your email address will not be published.