‘रामदासी समलिंगी संघाचा धर्मा(ठक)धिकारी’

प्रसिद्ध बहुजन विचारवंत आणि इतिहासकार मा.म.देशमुख यांच्या भाषेत सांगायचे झाले तर रामदासी समलिंगी संघाच्या या धर्माधिकार्‍याने बैठकीच्या नावाखाली बहुजनांच्या अनेक पिढ्या बरबाद केल्या आहेत. ‘स्वारी’ प्रसन्न झाली म्हणून धर्माधिकार्‍यांच्या उपस्थितीत त्या श्री सदस्यांना मृत्यू आला असेही भक्ताड लोकं सांगत आहेत, असे जे कांगावा करत आहेत त्यांची बुद्धी व तर्क ठिकाण्यावर आहे का ?

1 369

‘रामदासी समलिंगी संघाचा धर्मा(ठक)धिकारी’

 

 दिलीप बाईत

दै. मुलनिवासी नायक चे कार्यकारी संपादक

 

खारघरमधील ‘महाराष्ट्र भूषण’ छे….‘ब्राम्हण भूषण’ पुरस्कार सोहळ्यात १२-१३ श्री सदस्यांचा उन्हाच्या तडाख्याने व पाण्याविना तडफडून मृत्यू झाला. हा आकडा सरकारी आहे. त्यापेक्षाही अनेक श्री सदस्यांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. एका बाजूला लोकं तडफडून मरत असताना दुसर्‍या बाजूला शामीयानात व्हीआयपी लोकांसाठी जेवणावळी झोडण्यात येत होत्या. एवढे निर्दयी आणि भावनाशून्य सरकार असू शकते का? परंतु आपण भावनाशून्य आहोत याचा प्रत्यय शिंदे-फडणवीस सरकारने आणून दिला. कुठल्याही गेलेल्या जीवाचे मोल करू शकतो का? परंतु जी लोकं गेली त्यांच्या कुटुंबियांना ५ लाख रूपये देऊन सरकार व धर्माचा ठेकेदार असलेल्या धर्माधिकार्‍याने मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार केला आहे. प्रसिद्ध बहुजन विचारवंत आणि इतिहासकार मा.म.देशमुख यांच्या भाषेत सांगायचे झाले तर रामदासी समलिंगी संघाच्या या धर्माधिकार्‍याने बैठकीच्या नावाखाली बहुजनांच्या अनेक पिढ्या बरबाद केल्या आहेत. ‘स्वारी’ प्रसन्न झाली म्हणून धर्माधिकार्‍यांच्या उपस्थितीत त्या श्री सदस्यांना मृत्यू आला असेही भक्ताड लोकं सांगत आहेत, असे जे कांगावा करत आहेत त्यांची बुद्धी व तर्क ठिकाण्यावर आहे का ? हे असे का होते? याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
रेवदंड्याच्या कुडमुड्या जोतिष असलेल्या धर्माधिकार्‍याने रामदासी बैठक नावाचा प्रकार सुरू केला. या बैठकीत रामदासी पंथाचे उदात्तीकरण करण्यात आले आहे. ब्राम्हण कितीही झाला भ्रष्ट्र तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ अशाप्रकारे बतावणी करणार्‍या रामदासाच्या बैठकीने बहुजनांचा मेंदू गुलाम करण्यात आला आहे. मन, मनगट आणि मेंदूवर ताबा मिळवून हवी ती लुटमार करण्यात येत आहे. ज्यावेळी एखादा व्यक्ती देव आणि धर्माच्या आहारी जातो त्यावेळी त्याला केवळ आपल्या ‘स्वारी’ने काय सांगितले आहे हेच त्याला प्रमाण वाटते. खारघरची घटना घडली त्याला धर्माधिकारीच जबाबदार आहे. स्वारींची ‘आज्ञा’ आली असे सांगून लाखोंच्या संख्येने असलेल्या आंधळ्या भक्तांना या कार्यक्रमाला बोलावले गेले असावे. भर उन्हात त्यांना पाण्याविना तडफडून मारण्यात आले. बरं धर्माधिकारी यांचे महाराष्ट्रासाठी योगदान काय? जर त्यांचे महाराष्ट्रासाठी योगदान नसेल तर महाराष्ट्र भूषण देण्यात अर्थ काय? आणखी एक कहर म्हणजे एकाच घरात दोन महाराष्ट्र भूषण दिले गेले आहेत. आजपर्यंत कमीतकमी १८ जणांना महाराष्ट्र भूषण देण्यात आला आहे. त्यातील १६ ब्राम्हण आहेत. याचा अर्थ बहुजनांकडे कुठलीच पात्रता नाही असे दाखवण्याचा आधुनिक पेशवाईचा प्रयत्न आहे. खरं म्हणजे बहुजनांकडेच ठासून गुणवत्ता भरलेली आहे. परंतु या देशाची व्यवस्थाच ब्राम्हणांच्या हातात असल्याने लायकी नसलेल्या ब्राम्हणांना पुरस्काराची खिरापत वाटली जात आहे. बहुजनांना बैठकीच्या नादी लावून त्यांना गुलाम बनवल्याने धर्माधिकारी यांना पुरस्कार दिला गेला आहे. कारण धर्माधिकारी यांनी ब्राम्हणी व्यवस्था टिकवण्यासाठी फार मोठे काम केले आहे. एवढेच नाही तर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू नसताना रामदासाला गुरूपद बहाल करण्याचा खटाटोप करण्यात आला आहे. आज बैठकीला जाणार्‍या आमच्या बहुजन समाजातील घरात रामदास शिवाजी महाराजांना दिशा दाखवतोय अशाप्रकारे फोटो लावलेला असतो. म्हणजे जाणीवपूर्वक शिवाजी महाराजांची बदनामी करण्याचे काम केले जात आहे. त्यात धर्माधिकारी याचा मोठा हात आहे.
मूलनिवासी बहुजन संतांनी कधीच कुणाची लुटमार केली नाही. वारकरी संतांनी नेहमीच प्रबोधनाचे काम केले आहे. म्हणून जगतगुरू तुकाराम महाराज म्हणतात ‘भले तरी गांडीची देऊ लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी’. तर वेद, शास्त्रे, पुराणे, देव आणि धर्माची भीती दाखवून धर्माधिकारीसारख्या अनेक ब्राम्हणांनी लुटमार सुरू केली आहे. ब्रम्ह, परब्रम्ह, माया, संसार, भवसागर, मुक्ती हे शब्द बहुजनांना लुटण्यासाठीच ब्राम्हणांनी निर्माण केले आहेत. या शब्दांच्या चक्रव्युहात बहुजन अडकतो आणि त्यातून त्याला कधीच बाहेर पडता येत नाही.
माया ब्रम्ह ऐसे म्हणती धर्मठक, आपणासरीसे लोक नागविले
विषयी लंपट शिकवी कुविद्या, मनामागे नांद्या होवूनी फिरे
करूनी खाता पाक जिरे सुरण राई, करिता अतित्याई दु:ख पावे
औषध द्यावया चाळविले बाळा, दावूनिया गुळा दृष्टीपुढे
तरावया आधी शोधा वेदवाणी, वांझट बोलणी वारा त्याची
तुका म्हणे जया पिंडाचे पाळण, न घडे नारायण भेट तथा.
याचा अर्थ माया, ब्रम्ह असे पोकळ तत्वज्ञान धर्मठक असलेले ब्राम्हण सांगत असतात. त्यातूनच भोळ्या-भाबड्या लोकांना नागवतात व त्यांची फसवणूक करतात. जगतगुरू तुकाराम महाराजांनी अशा धर्मठक ब्राम्हणांना त्यांच्या शब्दात फटकारले आहे.
खारघरच्या घटनेत आपलेच श्री सदस्य पाण्याविना तडफडून मृत्युमुखी पडले आहेत, मग आपण महाराष्ट्र भूषण पुरस्कार का स्विकारावा तो परत करायला हवा याची वाच्यता धर्माधिकारी यांनी केलेली नाही. प्रबोधनकार ठाकरे यांच्या भाषेत सांगायचे झाले तर ‘गोळीला तुम्ही आणि पोळीला आम्ही’. खारघरच्या घटनेत मरणारा बहुजन आहे, आम्हांला काय त्याचे? कारण आमची ब्राम्हणी पिलावळ ही विदेशी आहे. हे धर्माधिकारी यांना माहित आहे. गुलामांचा आणि गुलाम करणार्‍यांचा धर्म एक कसा? असा राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या शाळेत चौथी इयत्तेत शिकणार्‍या मुक्ता साळवे यांचा प्रश्‍न अगदी रास्त आहे. त्यावेळी मुक्ता साळवे असा प्रश्‍न विचारण्याचे धाडस करते मात्र आजच्या घडीला आमच्या बहुजनातील पीएचडीधारक व्यक्ती असा प्रश्‍न विचारत नाही. यावरून बहुजनातील शिकलेल्या लोकांचा मेंदू कसा ब्राम्हणांकडे गहाण आहे हे लक्षात येते. धर्माधिकारीसारख्या अनेक ब्राम्हणांनी हेच हेरले आणि देवा-धर्माच्या नादी लावून बहुजनांना तर्कच करू दिला नाही. म्हणूनच आज बहुजनांच्या अनेक पिढ्या बरबाद होत असतानाही बहुजन जागा होताना दिसत नाही. तथागत बुद्ध, राष्ट्रसंत कबीर, राष्ट्रसंत नामदेव महाराज, जगतगुरू तुकाराम महाराज, मॉंसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले, सावित्रीमाई फुले, छत्रपती शाहू महाराज, विश्‍वरत्न-महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या अशा मूलनिवासी संत, महापुरूषांचा बहुजनांसमोर आदर्श असताना त्यांचे विचार डोक्यात न घेता रामदासाचे विखारी कुविचार आत्मसात करतात हीच मोठी शोकांतिका आहे. मात्र खारघरच्या घटनेने तरी रामदास व धर्माधिकार्‍याच्या नादी लागलेल्या बहुजनांना जाग येईल अशी आशा करायला हरकत नाही. शेवटी आशावादी असणे हेच आपल्या हातात आहे.

1 Comment
  1. Vijay Maroti Wasekar says

    आसे कसे राघवाचे मोठे झाले बहुजना मूळे

Leave A Reply

Your email address will not be published.