रविराज व चैतन्य भिसे ९९.२० टक्के घेऊन साई विद्यालयातून प्रथम सारसा गावच्या सुपुत्रांचा दहावीच्या निकालात डंका; ग्रामस्थांतून अभिनंदनचा वर्षाव

0 117

रविराज व चैतन्य भिसे ९९.२० टक्के घेऊन साई विद्यालयातून प्रथम

-सारसा गावच्या सुपुत्रांचा दहावीच्या निकालात डंका; ग्रामस्थांतून अभिनंदनचा वर्षाव

साई विद्यालय तांदुळजा चा १०० टक्के निकाल

लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च २०२४ मध्ये १० वीच्या परिक्षा घेण्यात आल्या. या परीक्षेचा निकाल सोमवारी (दि.२७) रोजी जाहीर झाला. यामध्ये लातूर बोर्डाचा निकाल ९५.८१ टक्के लागला. यामध्ये रविराज पोपट भिसे व चैतन्य बापू भिसे या दोघांनी याने ९९.२० टक्के मिळवत साई विद्यालयातून प्रथम क्रमांक मिळविला. त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक जनक गायकवाड यांनी अभिनंदन केले असून सारसा गावच्या या सुपुत्रांचा दहावीच्या निकालात डंका वाजवल्याने सारसा ग्रामस्थातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

साई विद्यालय तांदुळजा येथील शाळेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. परीक्षेस एकूण ४२ विद्यार्थी बसलेले होते. त्यात विशेष प्राविण्य प्राप्त ३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर ९० टक्के च्या पुढे त्यापैकी २० विद्यार्थ्यांनी गुण संपादन करून घवघवीत यश मिळविले आहे. प्रथम विद्यार्थी चैतन्य बापू भिसे ९९.२० टक्के रविराज पोपट भिसे ९९.२०टक्के. द्वितीय विद्यार्थिनी श्रेया त्रिंबक राऊत ९८.८० टक्के. तृतीय विद्यार्थी सिद्धी अनंत बावणे ९८:०० टक्के प्राप्त गुण घेतलेले आहेत. प्रथम श्रेणीत ४ विद्यार्थी आहेत
तांदुळजा येथील साई विद्यालयाने दहावीच्या निकालाची परंपरा यावर्षीही कायम ठेवली‌. १० वी च्या परिक्षेत रविराज पोपट भिसे (५०० पैकी ४९६) व चैतन्य बापू भिसे (रा. सारसा) या दोघांना ९९.२० टक्के मिळवून यश संपादन केले. त्याबद्दल आई वडील कविता पोपट भिसे यांनी त्याचे पेढे भरून तोंड गोड करीत अभिनंदन केले. यावेळी बहीण साक्षी, प्रणिता व आजी आजोबा लोचनाबाई बाबुराव भिसे यांनी पेढे भरून तोंड गोड केले. मिळालेल्या आपल्या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना रविराज म्हणाला की, “माझे आई-वडील आणि माझ्या शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे हे यश प्राप्त करू शकलो.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष जनक गायकवाड, मुख्याध्यापिका शरयु गायकवाड, मार्गदर्शक शिक्षक छत्रगुण गरड, विवेक पुरी, ओमकार गिरी, प्रवीण पवार, शैलेश यादव, हनुमंत डोईफोडे, शोभा चव्हाण, रेखा कदम यांनी मार्गदर्शन केले. सर्व उत्तीर्ण, विद्यार्थ्यांचे, पालकांचे, शिक्षक व शिक्षेत तर कर्मचा-यांचे शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.