हिंदू मुलगी पळवल्याची अफवा; पोलिसांनी दाखवली दक्षता

0 367

हिंदू मुलगी पळवल्याची अफवा; पोलिसांनी दाखवली दक्षता

 

मलकापूर (नंदकिशोर भारसाकळे) : एका हिंदू मुलीला मुस्लिम धर्मीय तिघांकडून एका ट्रक मधून पळवून नेत असल्याची घटना दिनांक ११ जून च्या रात्री साधारणतः दहाच्या सुमारास घडल्याची बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली. वाऱ्यासारख्या पसरलेल्या या घटनेच्या माहितीने मलकापूर शहर पोलिसांची भंबेरी उडताच त्यांनी तात्काळ संबंधितांना ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून चौकशी केली असता सदरील मुलगी हिंदू नसून मुस्लिम असल्याची खात्री पटल्याने पोलीस प्रक्रियेनंतर सोडून देण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शहरातील बस स्थानक परिसरात एका ट्रक मध्ये एका हिंदू मुलीला तिघेजण पळून नेत असल्याची काहींना शंका निर्माण झाली. काही समुदायाकडून हिंदू मुलगी असल्याची बतावणी केली गेली. या बतावणीला वाऱ्यासारखे उधाण आले. संपूर्ण शहरभर पसरलेल्या या बातमीला भावनात्मक रूप आले. दरम्यान शहरात पसरलेल्या बातमीने पोलीस प्रशासन सुद्धा खडबडून गेले. सामाजिक वादाची ठिणगी पडण्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले. पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सदर प्रकरणात गांभीर्यपूर्ण चौकशी केली सदर मुलगी ही हिंदू नसून मुस्लिम आहे व आपल्या खात्री पटवून घेऊन पोलीस प्रक्रियेनंतर त्यांची सुटका करण्यात आली. मलकापूर पोलिसांनी या घटनेकडे तात्काळ लक्ष घालून घटनेची सत्यता समोर आणल्यामुळे सामाजिक वादाची ठिणगी टळल्याचे सांगण्यात येत असून या कर्तव्यदक्ष पोलिस प्रशासनाचे नागरिकांकडून आभार मानण्यात येत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.