महामारीसाठी तयार राहा डॉ. टेड्रोस

0 561

महामारीसाठी तयार राहा डॉ. टेड्रोस

 

corona : कोरोनाचा फटका संपूर्ण जगाला बसला होता. कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून, लॉकडाउनच्या साखळीत अडकलेलं जाग आता सावरलं पण जागतिक आरोग्य संघटनेने मात्र पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवत एक गंभीर इशारा दिला आहे. सोमवारी  जागतिक आरोग्य परिषदेच्या  बैठकीत जागतिक आरोग्य संगटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस यांनी कोरोना महामारी अद्याप संपली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

डॉ. टेड्रोस यांनी पुढील महामारी कोरोनापेक्षाही जीवघेणी असू शकते या महामारीसाठी तयार राहा असा इशाराच संपूर्ण जगाला दिला. जगाने आता पुढील महामारीसाठी तयार राहण्याची गरज आहे. पुढील महामारी कोरोनापेक्षाही भयानक असू शकते, असही टेड्रोस म्हणाले आहेत.

कोरोनाचा जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून शेवट झाला असला तरी जागतिक आरोग्यासाठी तो धोका म्हणून अद्याप कायम आहे, आणखी एखादा व्हेरियंट उदयाला येण्याचा धोका अद्याप कायम आहे, जो रोग आणि मृत्यूसाठी कारणीभूत ठरु शकतो. आणखी घातक संभाव्यतेसह आणखी एक रोग उदयास येण्याची शक्यता कायम आहे”, असही त्यांनी सांगितलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख 76 व्या जागतिक आरोग्य परिषदेत आपला रिपोर्ट सादर करत होते. यावेळी त्यांनी हा इशारा दिला आहे, आपण ज्याला सामोरं गेला, आहोत त्यापेक्षाही महामारी भयानक असते अशा प्रकारच्या आणीबाणी समजून घेण्यासाठी आणि त्यांचा सामना करण्यासाठी प्रभावी जागतिक यंत्रणेची गरज त्यांनी यावेळी बोलून दाखवली. जेव्हा पुढील महामारी आपला दरवाजा ठोठावेल तेव्हा आपण सर्वांनी निर्णायकपणे, एकत्रितपणे त्याचा सामना करण्यास सज्ज असलं पाहिजे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.