जेष्ठ विचारवंत साहित्यिक डाॅ. हरि नरके काळाच्या पडद्याआड – पुरोगामी संघटनांची मोठी हानी

0 64

जेष्ठ विचारवंत साहित्यिक डाॅ. हरि नरके काळाच्या पडद्याआड

– पुरोगामी संघटनांची मोठी हानी

 

मुंबई : क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्यावर लेखन करणारे, साहित्यिक विचारवंत लेखक प्रा. हरी नरके यांचं निधन झालं. यावेळी ते ७० वर्षांचे होते. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते, मुंबईतल्या एशियन हार्ट रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ओबीसींच्या प्रश्नांवर त्यांनी नेहमी आवाज उठवला या प्रश्नावर त्यांचा मोठा अभ्यास होता. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ओबीसी प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांना अनेकदा धारेवर धरलं होतं. त्यांच्या निधनाने पुरोगामी चळवळीचे मोठ नुकसान झाले आहे.

पुणे येथिल सावित्रीबाई फुले विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे अध्यासन प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे. ते महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांचं उल्लेखनीय काम केलं आहे. पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवरही त्यांचं उल्लेखनीय काम होतं. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले आहे.

“पुरोगामी विचारांचा प्रचार आणि प्रसार करणारे डाॅ. हरि नरके यांना रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड) कडून भावपुर्ण श्रद्धांजली”

सकाळी मुंबईला येत असताना सहा वाजता गाडीत त्यांना दोन वेळा उलट्या झाल्या. त्यानंतर एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला, असे सांगितले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.