साहेब आम्हाला निर्णय मान्य नाही कार्यकर्त्यांची नाराजी, सभागृहात जोरदार गोंधळ

0 92

साहेब आम्हाला निर्णय मान्य नाही कार्यकर्त्यांची नाराजी, सभागृहात जोरदार गोंधळ

 

मुंबई : शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या लोक माझे सांगाती या आत्मकथेच्या दुसऱ्या भागाचं प्रकाशन आज झालं. याच भाषणात त्यांनी निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. सार्वजनिक जीवनात कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला.

साहेब आम्हाला तुमचा निर्णय मान्य नाही, आपण आपला निर्णय मागे घ्या, आम्हाला आपला खूप मोठा आधार वाटतो, अशी भावनिक साद घालत कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. सुमारे अर्धा तास ही घोषणाबाजी सुरु होती. शेवटी अजित पवार यांनी माईक हाती घेऊन कार्यकर्त्यांना शांत राहण्याच्या सूचना केली. तोपर्यंत शेकडो कार्यकर्त्यांनी मंचावर शरद पवारांना गराडा घातला होता.

राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे तर पवारांच्या पायाशी बसून राहिले. शेवटी नेते-कार्यकर्त्यांच्या मताचा रेटा पाहून माझ्या घोषणेवर समिती जो निर्णय घेईन, तो निर्णय पवारसाहेबांना मान्य असेल, असं अजित पवार म्हणाले. तरीही कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. साहेबांचा निर्णय झाल्याशिवाय आम्ही गावाला जाणार नाही, असं कार्यकर्ते म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.