वाचाळविरांचा सरदार कोण……?

0 225

वाचाळविरांचा सरदार कोण……?

 

विनोद पंजाबराव सदावर्ते
समाज एकता अभियान
रा. आरेगांव ता. मेहकर
मोबा: ९१३०९७९३००

पुरोगामी महाराष्ट्रात तर्कहीन, द्वेषाने भरबटलेले, आणि विषमतेची घाण डोक्यात असणाऱ्या, वाचाळविरांची संख्या कमी नाही. मेंदुचा वापर समाजात शांतता व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी जास्त प्रमाणात करून धर्माला व सत्तेला ढाल बनवले जाते हि गोष्ट सामाजिक न्याय, समता व देशाच्या विकासाला घातक आहे. ज्या लोकांना माणसासोबत कसे रहावे, ज्यांच्या नावात, शिक्षणात काळाबाजार आहे. अशा लोकांना विद्वान, आदर्श मानुन शासकीय व जनतेची जबाबदारी असलेले लोक त्यांच्या समोर झुकतात तेव्हा झुकणाऱ्याच्या बुद्धीची किव तर येतेच लोकशाही, नितीमत्ता व विद्वता धोक्यात आहे याची खंत वाटते. आपण महालराष्ट्राचा जरी विचार केला तरीही आपल्याला प्रत्येक ठिकाणी सत्तेच्या आर्शिवादाने विषमता, व अन्याय दिसून येतो. यात नवीन असे काही नाही संपूर्ण महाराष्ट्राला याची जाणीव आहे. धर्माचा आधार घेऊन इतरां बद्दल चुकिचे व वादग्रस्त विधाने करून जनतेचे लक्ष मुळ समस्येवरून बाजूला सारून धर्माच्या व धर्माला पोषक असणाऱ्या वाचाळविरांना येथे संरक्षण दिले जाते. आपण अनेक घटना बघितल्या तर आपल्या लक्षात येते कि येथे विषमता व द्वेष कशा पद्धतीने मजबूत करून विकृत लोकांना मोठे केले जात आहे. एखादी घटना, गुन्हा घडल्यानंतर त्या घटनेतील गुन्हेगाराची जात शोधली जाते. आणि जर आरोपी मुस्लिम असेल तर लहान गोष्टही भावनिक तिव्रतेने मोठी केली जाते. ठिकाणी आंदोलन, मोर्चे, मुस्लिम विरोधी विधाने केले जातात. आणि यामध्ये महाराष्ट्राचे गृहमंत्री सुद्धां मागे राहत नाही. चुकीच्या व देशाच्या हितविरोधी बाबींसाठी सर्वांनी आक्रमक पणे उभे राहुन देशाचे हित, जनकल्याण व शांतता सुव्यवस्था बघने प्रत्येकांचे कर्तव्य आहे. परंतु मुस्लिम आरोपी असेल तर प्रत्येक बाबींची तिव्रता जास्त असते. आरोपी ला तात्काळ अटक केली जाते. परंतु जेव्हा आरोपी हा मुस्लिम नसुन तो हिंदुत्ववादी संघटनेशी, सत्तेशी संबधीत असतो तेव्हा मात्र गुन्हा कितीही गंभीर असला तरीही त्याला तात्काळ अटक होत नाही, आंदोलन, मोर्चे निघत नाहीत, उलटपक्षी आम्ही घटनेची शहानिशा करून योग्य ती कार्यवाही करू असे बोलून गृहमंत्री गंभीर बाबही अगदी किरकोळ करून गंभीर बाबींच्या आरोपींना पाठीशी घातले जाते. आणि जेव्हा सर्व सामान्य जनता वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त व्हायला लागतात तेव्हा गृहमंत्री साहेबांच खाते सोशल मिडीयावर कोणत्याही व्यक्ती, धर्म जात किंवा द्वेष पसरवणाऱ्या बाबी शेअर करू नये आणि तसे केल्यास त्यांच्या वर गुन्हे दाखल करण्यात येतील असे पत्र, आदेश काढतात आणि सोशल मिडीयावर मत व्यक्त केल्याने अनेक तरुणांवर गुन्हे दाखल झाल्याचेही उदाहरणे आहेत. मग मुळ मुद्दा हा येतो. मुस्लिम आरोपींना कोणतीही शहानिशा न करता तात्काळ अटक व हिंदुत्ववादी संघटनेशी संबधित लोकांना सरकार च क्लिन चिट देत असेल तर हा जातीवाद, धर्म वाद, विषमता पसरवणारे कृत्य नाही का? हिंदुत्ववादी संघटनेशी संबधीत विकृत माणसिकतेचे अनेक मनोरुग्ण आज समाजामध्ये फिरून चुकिचा इतिहास सांगत आहेत, राष्ट्र व राष्ट्रीय प्रतिकांचा अवमान करत आहेत. स्वातंत्र्य सेनानी व महापुरुषांबद्दल चुकिचे विधाने करणारे मनोरुग्ण बाहेर फिरुन सामाजिक वातावरण दुषीत करत असताना, त्यांना थांबवने, त्यांच्या वर बंधने घालुन शांतता व सुव्यवस्था निर्माण करणे हे सरकारचे काम आहे. मनोरुग्ण व विकृत व्यक्तीला बाहेर फिरू देऊ नका, विकृती पसरवून समाजातील तरुणांची दिशाभूल करणाऱ्यांना आवरण्याची विनंती लोक सरकार ला करतात तरीही सरकार विकृत लोकांवर आळा घालत नाही. आणि समाजात चुकिचा इतिहास पसरू नये, राष्ट्र व राष्ट्राच्या प्रतिकांचा अवमान होऊन नये म्हणून संविधानीक मार्गाने विकृतींना थांबण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा सर्व सामान्य लोकांवर गुन्हे दाखल केले जातात. आणि विकृतींना मोकाट फिरू दिले जाते यालाच निरपेक्ष व पारदर्शक सरकार म्हणायचे का? मनोहर कुलकर्णी नावाचा वयोवृध्द विकृत मनोरुग्ण, देशाचे स्वातंत्र्य, देशाचा ध्वज, राष्ट्रगीत मान्य करत नाही अशा व्यक्तीचे नागरिकत्व रद्द करून तुरुंगात डांबुन ठेवायला पाहिजे तर देश विरोधी वक्तव्य करणाऱ्या विकृतींना सरकार संरक्षण देते. कशामुळे तर तो केवळ हिंदुत्ववादी पुरस्कार करतो म्हणून. मनोहर कुलकर्णी च्या जागेवर जर एखादा मुस्लिम असता तर सरकार, गृहमंत्री व भक्त खरचं एवढे शांत बसले असते का? मनोहर कुलकर्णी गांधीच्या वडीलांवर वादग्रस्त वक्तव्य करून त्यांना चोर म्हणतो, देशाच्या माजी प्रधानमंत्र्यांना तो अकार्यक्षम म्हणतो, गृहमंत्र्यांना या बाबीब त्यांच्या विभागाकडून कोणतीही माहिती नसेल मिळाली पण सर्वसामान्य लोक एवढ्याप्रमाणात निवेदने देऊन त्या विकृत मनोरुग्णाला अटक करावी याची मागणी करतात पण सरकार काहीच गांभीर्याने घेत नाही. सरकार गांभीर्याने घेत नाही म्हणून जनता सोशल मिडीयावर व्यक्त होते. मात्र अशा बाबतीत व्यक्त होताना कोणाच्याही वैयक्तिक भावना व धर्म द्वेष होईल अस वक्तव्य व लिखाण करू नका असे आदेश दिले जातात. परंतु लोकांना धर्म जात व्यक्ती यावर वैयक्तिक मत मांडण्याची परिस्थिती च सरकारने निर्माण होऊ देऊ नये. यासाठी मात्र सरकार काहीच करत नाही. मनोरुग्ण कुलकर्णी यांचा आणि जनतेचा वैयक्तिक असे वाद कोणतेच नाहीत परंतु तो चुकिचे विचार सांगून राष्ट्र व राष्ट्रीय सन्मानाच्या विरोधात वागत असताना लाखों लोकांना आदेश दिल्यापेक्षा एका मनोरुग्णाला अटक केली तर लोकांना मत व्यक्त करण्याची गरजच नाही. परंतु मनोरुग्णाला अटक न करता सर्वसामान्य लोकांवर गुन्हे दाखल केले जातात तर धर्मवाद, जातीवाद व विषमता पसरवणारे कृत्य नाही का? आमचे गृहमंत्री स्वराजाचे शत्रु औरंजेब यांना औरंग्या म्हणतात. शत्रुचाही सन्मान करावे ही आमच्या शिवबाची शिकवण असताना त्याच शिवबाचे नाव घेऊन औरंजेबाला ते औरंग्या म्हणतात. कारण काय तर ते स्वराज्याचे शत्रु होते. आता मुळ प्रश्न हा आहे. कि स्वराज्याचा आज शत्रु कोणाला म्हणायचे? जे विदेशी आहेत त्यांना? जे मुस्लिम आहेत त्यांना? कि जे देशात राहुन देश विरोधी कृत्य करत करतात त्यांना? देशात राहुन देशाची घटना, राष्ट्र, राष्ट्रीय प्रतिके, राष्ट्रगीत, व महापुरुषांचा अवमान करणारा खरा शत्रु होय. मग औरगंजेबाला ज्या तिव्रतेने गृहमंत्री साहेबांनी औरंग्या म्हणले होते त्याच तिव्रतेने ते मनोहर कुलकर्णी यांना ते मन्या म्हणतील का? कारण मनोहर कुलकर्णी देखील आज राष्ट्रद्रोह करत आहे. औरंगजेब हा शत्रु होता म्हणून विरोध आहे की मुस्लिम होता म्हणून विरोध आहे. शत्रु होता म्हणून विरोध असेल तर फडणवीस साहेबांनी मनोहर कुलकर्णी यांनाही विरोध करावा, आणि जर मुस्लिम होता म्हणून औरंगजेब ला विरोध होत असेल तर फडणवीस साहेब धार्मिक द्वेष पसरवतात म्हणून गुन्हा दाखल का होऊ नये? सत्य बोलले तर धर्म, जात व्यक्ती यांची बदनामी होते अस गृहमंत्री यांच्या बोलण्याचा अर्थ निघतो परंतु गृहमंत्री यांचे कृत्य निरपेक्ष आहे का हा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तिकडे तो दुसरा मनोविकृत मनोरुग्ण शरद पोक्षे म्हणतो आरक्षण आणि कोणतीही सवलत नसताना माझी मुलगी वैमानिक झाली. मुलगी वैमानिक झाली या मागे सावित्रीमाई फुले व भारतीय संविधान खंबीरपणे उभे आहे. आणि मुलगी वैमानिक झाली हे याचा अभिमान सर्वांना आहे. परंतु शरद पोक्षे आरक्षणा बद्दल चुकिचे विधान करतो आणि सरकार त्यावर कोणतीही कारवाई करत नाही. मग वैचारिक पद्धतीने जर पोक्षेला उत्तर दिले तर जातीवाद होतो. हजारो वर्षांपासून शिक्षणावर एकाधिकार हा ब्राम्हणांचा होता. म्हणून ब्राह्मण न्याय व नितीवान आणि समतावादी नसल्याने त्यांनी त्यांच्या घरातील महिलांना सुद्धां शिक्षणाचा गंधही लागु दिला नाही अथवा कोणत्याही ब्राम्हणाने महिलांच्या शिक्षणाचा पुरस्कार केला नाही. इंग्रज भारतात आले त्यांनी शिक्षणाची सुरवात केली, सावित्रीमाई व जोतीबा यांनी जेव्हा मुलींना शिक्षण सुरू केले तेव्हा विरोध करणारे ब्राम्हणच होते. मुलीला शिकवले तर धर्म बुडतो असे सांगुन महिलांचे शिक्षण नाकारणारे ब्राम्हण आणि विरोधाला न जुमानता महिलांना शिक्षण देणारे सावित्रीमाई व जोतिबा फुले यामध्ये फुले दांपत्य. याच दांपत्यामुळे महिलांना शिक्षणाची संधी निर्माण झाली. पुढे बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय घटनेमध्ये लिंगभेदाचा विरोध न करता प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार मिळवून देऊन त्या अधिकाराचे संरक्षण केले. परंतु एवढा इतिहास कळेल एवढा विद्वान शरद पोक्षे नाही. आणि आरक्षण म्हणजे सवलत नाही नाही तर संधी आहे. ब्राम्हणांनी हजारो वर्षांपासून माणसाला माणसाजवळ येऊ दिले नाही, शिक्षण, उद्योग यापासून कोसो दुर ठेवले, ते सर्व संविधानाने हानुन पाडून सर्वांना समान केले. ब्राह्मण जातीवाद करतात आणि ते इतरांना आपल्या बरोबरीने येऊ देत नाही. म्हणून त्यांच्या बरोबरीने जाण्यासाठी आरक्षण आहे. आजही ब्राम्हणाकडे न्याय व समता नाही. जर तसे असते तर मंदिरात आरक्षण नाही तर ब्राम्हणेत्तर लोक पुजारी सोडा गाभाऱ्यात जाऊ शकत नाहीत. ब्राम्हणेत्तर लोक सोडा ब्राम्हणांच्या महिला पुजारी होऊ शकत नाहीत कारण त्यांचा धर्म त्यांना होऊ देत नाही. परंतु ब्राम्हण असो वा आदिवासी प्रत्येकाला कोणत्याही शासकीय व सार्वजनिक पदावर जावे लागते ही देण फक्त भारतीय संविधानाची आहे. आणि महिला शिक्षण घेतात या मागे सावित्रीमाईचा त्याग आहे हे पोक्षे जाणीव पुर्वक बोलत नाहीत कारण डोक्यात व कृतीत केवळ विषमता आणि द्वेष आहे. पोक्षे कडे थोडासा जरी प्रामाणिक पणा असता तर त्याने सांगितले असते आमच्या कडे हजारो वर्षांपासून शिक्षण होते पण आम्ही महीलांना शिकवू शकलो नाही. आजही आमच्या ताब्यात मंदीरे आहेत पण महिलांना पुजारी बनवू शकलो नाही फक्त सावित्रीमाईच्या त्यागाचे व बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने माझी मुलगी वैमानिक बनली. कारण सत्य बोलायला नितीमत्ता लागते आणि तिच नितीमत्ता पोक्षे, मनोहर कुलकर्णी अशा लोकांकडे नाही. परंतु अशा मनोरुग्ण लोकांना पाठीशी घालून, त्यांना संरक्षण देऊन आणि त्यांच्या विरोधात पण सत्य बोलणाऱ्या वर गुन्हे दाखल केले जात असतील तर याचा सरळ सरळ अर्थ आहे वाचाळविरांना व मनोरुग्णाना सरकारच पाठीशी घालून समाजात शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून लोकांचे लक्ष मुळ समस्येपासून दुर करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु घोटाळेबाज लोकांच्या हाती अर्थखाते, पैशाचा जोरावर आमदार ची बोली, महागाई, बेरोजगारी, आरोग्य सुविधा, निकृष्ट दर्जाचे काम व करोडोचे घोटाळे, जळते मनीपुर, नग्न महिलांची धिंड अशा अनेक समस्या सर्वसामान्य जनता कधीच विसरु शकत नाही. सरकारने कितीही वाचाळविर व मनोरुग्णाच्या माध्यमातून सामाजिक शांतता व सुव्यवस्थेचा निर्माण होण्यासाठी प्रयत्न केला तरीही आता लोक जागृत झाले आहेत. आणि वाचाळविरांचा व मनोरुग्णाचा सरदार कोण हे याची ओळख जनतेला झाली आहे. परंतु सरकार ने केलेल्या विषमता, धर्मद्वेष, व्यक्तीद्वेष, व पक्षपाती पणाचे कृत्य हे देखील शिक्षेस पात्र आहे. हाती सत्ता आहे म्हणून सत्तेचा गैरवापर करू नये हे नितीमत्येचे लक्षण आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.